वाशिम - कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या जनता कर्फ्यूच्या आवाहनाला जिल्ह्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रविवारी सर्व व्यवहार आणि दुकाने बंद ठेवण्यात आले. शहराबरोबर ग्रामीण भागातही संचारबंदीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.
जिल्ह्यातील सहाही तालुक्याच्या ठिकाणासह ग्रामीण भागातील जनतेने बंद यशस्वी होण्यासाठी घरीच बसून बंदमध्ये सहभाग नोंदवला. या कर्फ्युला 100 टक्के प्रतिसाद मिळाल्याने शहरासह ग्रामीण भागात सर्वत्र शुकशुकाट दिसला.