महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाशिममध्ये बँकेतून पैसे काढण्यासाठी रांगा, 'सोशल डिस्टन्सिंग'चा उडाला फज्जा - लॉकडाऊन

वाशिम जिल्ह्यातील भारतीय स्टेट बँकेचे ग्रामीण भागातील अनेक एटीएम बंद आहेत. त्यामुळे कारंजा, मालेगांव आणि रिसोड शहरातील बँकांसमोर पैसे काढणाऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळाले.

Washim
बँकेतून पैसे काढण्यासाठी रांगा

By

Published : Apr 7, 2020, 4:37 PM IST

वाशिम- जनधन खात्यातून पैसे काढण्यासाठी पहिल्याच दिवशी महिलांनी विविध बँकामध्ये प्रचंड गर्दी केली. कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये उदरनिर्वाहासाठी गरीब महिलांच्या जनधन खात्यात दरमहा 500 रुपये जमा झाले आहेत, हे पैसे काढण्यासाठी महिलांनी बँकांमध्ये गर्दी केली आहे. त्यामुळे पंतप्रधानांच्या 'सोशल डिस्टन्सिंग' आवाहनाचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले.

वाशिममध्ये बँकेतून पैसे काढण्यासाठी रांगा

वाशिम जिल्ह्यातील भारतीय स्टेट बँकेचे ग्रामीण भागातील अनेक एटीएम बंद आहेत. त्यामुळे कारंजा, मालेगांव आणि रिसोड शहरातील बँकांसमोर पैसे काढणाऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. या रांगांमध्ये महिलांसह सुशिक्षितांची मोठी संख्या असून पैसे काढण्यासाठी एटीएमसह पॉस मशीन व ई पेमेंटच्या पर्यायाकडे शहरातील नागरिक पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचे समोर आले.

ABOUT THE AUTHOR

...view details