महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाशिमकरांनो सावधान..! मास्क न घालता बाहेर पडल्यास ५०० रुपयांचा बसणार भुर्दंड

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्कचा वापर करणे, तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र, वारंवार आवाहन करूनही नागरिक नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहे. त्यामुळे यापुढे चेहऱ्यावर मास्क न घालता फिरणाऱ्या नागरिकांकडून ५०० रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे.

By

Published : Sep 13, 2020, 10:44 PM IST

तपास करताना पोलीस
तपास करताना पोलीस

वाशिम- जिल्ह्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने मास्क न बांधणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. प्रशासनाच्या वतीने शहरात सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालता फिरणाऱ्या नागरिकांकडून ५०० रुपये दंड आकारले जात आहे व त्यांना समज पत्र देण्यात येत आहे.

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्कचा वापर करणे, तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र, वारंवार आवाहन करूनही नागरिक नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहे. त्यामुळे, यापुढे चेहऱ्यावर मास्क न घालता फिरणाऱ्या नागरिकांकडून ५०० रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे. तसेच, एकाच नागरिकावर एकापेक्षा जास्त वेळा दंडाची रक्कम आकारण्यात आल्यास, अशा नागरिकाला शहरामध्ये फिरण्यास मज्जाव करण्यात येणार आहे. यासह त्याच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत.

हेही वाचा-जिल्ह्यातील एकूण प्रकल्पात 87.63 टक्के जलसाठा, तर धुक्यामुळे शेतकरी चिंतेत

ABOUT THE AUTHOR

...view details