वाशिम- लॉकडाऊन काळात घरगुती गॅससाठी होणारी गर्दी लक्षात घेता घरोघरी गॅस सिलेंडर वितरण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिले होते. आदेशानुसार सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत गॅस वितरणाची मुभा देण्यात आली आहे. मात्र, आज गॅस एजन्सींवर नागरिकांनी एकच गर्दी केली, त्यामुळे जिल्हा प्रशासन करत असलेल्या आवाहनाला नागरिकांकडून केराची टोपली दाखविली जात असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
वाशिममध्ये प्रशासनाच्या आदेशाची पायमल्ली; नागरिकांची गॅस एजन्सींवर गर्दी
आदेशानुसार सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत गॅस वितरणाची मुभा देण्यात आली आहे. मात्र, आज गॅस एजन्सींवर नागरिकांनी एकच गर्दी केली, त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा झाल्याचे दिसून आहे.
गॅस घेण्यासाठी मोठ्या संख्येने जमा झालेले नागरिक