वाशिम - गुढीपाडवा मराठी नवीन वर्ष म्हणून राज्यभरात गुढी उभारून साजरा केल्या जातो. मात्र वाशिम जिल्ह्यातील सिरसाळा येथे गुढी न उभारता भगवा झेंडा लावून हा सण साजरा करण्यात आला. या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांची हत्या झाल्यामुळे गुढ्या न उभारण्याचा निर्णय गावकऱयांनी घेतला.
वाशिममध्ये गुढीऐवजी भगवा झेंडा लावून गुढीपाडवा साजरा - year
गुढीपाडव्याच्या दिवशीच संभाजी राजे यांचा खून करून त्यांचे शीर उलटे लटकवले गेले. त्यावरुनच छत्रपतींच्या विरोधकांनी उपडा तांब्या ठेवून गुढ्या उभारण्याची परंपरा सुरू केली, असा एक मतप्रवाह आहे.
गुढीपाडव्याच्या दिवशीच संभाजी राजे यांचा खून करून त्यांचे शीर उलटे लटकवले गेले. त्यावरुनच छत्रपतींच्या विरोधकांनी उपडा तांब्या ठेवून गुढ्या उभारण्याची परंपरा सुरू केली, असा एक मतप्रवाह आहे. गुढ्या उभारणे म्हणजे संभाजी महाराजांच्या विरोधकांचे समर्थन करणे असे एक प्रवाह मानतो.
त्यामुळे, आम्ही गुढी न उभारता या दिवशी संभाजी राजे यांच्या फोटोचे पूजन करून फगवा झेंडा घरावर लावून सण साजरा करीत असल्याचं ग्रामस्थ सांगतात. या गावाप्रमाणे जिल्ह्यातील अनेक गावांत गुढी न उभारण्याची परंपरा अनेक वर्षांपासून आहे.