वाशिम -जिल्ह्यातील तेली बिटोडा येथे तेराव्याच्या जेवणातून 35 जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. गावातील भगवान वंजारी यांच्या तेराव्या निमित्त आलेल्या लोकांना जेवणातून विषबाधा झाली. विषबाधा झालेल्या सर्वांना जवळच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वाशिममध्ये तेराव्याच्या जेवणातून 35 जणांना विषबाधा... हेही वाचा... एकतर्फी प्रेम करणाऱ्याच्या त्रासाला कंटाळून मुलीची आत्महत्या
विषबाधा झालेल्या 35 जणांमध्ये 14 पुरुष आणि 12 महिलांचा तसेच 9 लहान मुलांना समावेश आहे. या सर्वांना विषबाधा झाल्याचे लक्षात येताच त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्वांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती, जिल्हा शल्य चिकित्सक अंबादास सोनटक्के यांनी दिली आहे.
हेही वाचा... 'माणदेशी महिलेचा प्रामाणिकपणा; अडीच तोळ्याचे सोन्याचे गंठण सापडलेल केलं परत'