वाशिम- मालेगाव येथे केळी रस्त्यावरील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील श्री विठ्ठलाची मूर्ती स्वयंभू असल्याची अख्याईका आहे. त्यामुळे तिथे भाविक मोठ्या संख्येने दर्शनाला येतात.आषाढी व कार्तीकी एकादशीला याठीणी भाविक मोठ्या संख्येने गर्दी होते.
वाशिममधील स्वयंभू विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
मालेगाव शहरातील केळी रस्त्यावरील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील श्री विठ्ठलाची मूर्ती स्वयंभू असल्याची अख्याईका आहे. त्यामुळे तेथे भाविक मोठ्या संख्येने दर्शनाला येतात. आषाढी व कार्तीकी एकादशीला याठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होत असते.
केळी रस्त्यावर मालेगाव लघु पाटबंधारे प्रकल्पालगत हे मंदिर आहे. मंदिर पूर्वाभिमुख आहे. मंदिराच्या कळसाची ऊंची 31 फूट आहे. मंदिरात गरुडाच्या आकाराच्या गर्भगृहात श्री विठ्ठल रुक्मिणी देवीच्या मूर्ती स्थापन करण्यात आल्या आहेत. श्री विठ्ठलाची मूर्ती स्वयंभू असल्याचे मानले जाते. यासह मंदिरात श्री गणेश, श्री शंकर, श्री निलनाग, श्री हनुमंत, शिववाहन नंदी यांच्या मूर्ती आहेत.
मंदिरासमोर बारा महिने पाणी असणारी विहीर आहे. मंदिरालगत श्री तुळजाभवानी, श्री संत गजानन महाराज यांची मंदिरे आहेत. श्री तुळजाभवानी मंदिरासमोर आसरामातेच्या मूर्ती स्थापन केलेल्या आहेत. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोरील मंदिरात श्री तुळजाराम गाभणे यांची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. ही मंदिरे स्व. तुळजाराम गाभणे यांनी बांधली आहेत. मंदिरासमोर सभामंडप आहे. संस्थानवर आषाढी एकादशी, महाशिवरात्री, चतुर्थी, नवरात्र महोत्सवात भाविक मोठ्या संख्येने दर्शनास येतात.