वाशिम- वर्षानुवर्षे जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये विविध घटनेतील प्रलंबित असलेला 67.92 लाख रुपयांचा मुद्देमाल मूळ मालकास वाशिम पोलीस दलातर्फे परत करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक वसंत परदेसी यांनी वाशिम जिल्ह्याचा आढावा घेतला असता, वर्षानुवर्षे पोलीस ठाणे येथे मुद्देमाल हा प्रलंबित असल्याचे दिसून आले. त्यावेळी त्यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात प्रलंबित असलेला मुद्देमाल मूळ मालकांच्या ताब्यात दिला.
पोलीस ठाण्यातील मुद्देमाल मूळ मालकास परत - वाशिम जिल्हा बातमी
पोलीस अधीक्षक वसंत परदेसी यांनी वाशिम जिल्ह्याचा आढावा घेतला असता, वर्षानुवर्षे पोलीस ठाणे येथे मुद्देमाल हा प्रलंबित असल्याचे दिसून आले. त्यावेळी त्यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात प्रलंबित असलेला मुद्देमाल मूळ मालकांच्या ताब्यात दिला.
पोलीस ठाण्यातील मुद्देमाल मूळ मालकास परत
हेही वाचा - मंगरूळपीरमध्ये संजय गांधीसह श्रावण बाळ निराधार योजना बंद, वृद्धांचे आंदोलन
या मोहिमेसाठी 1 पथक तयार करून गेल्या 2 महिन्यांपासून जिल्ह्यातील यंत्रणा कामाला लागली होती. या पथकाने जिल्ह्याची माहिती घेऊन पोलीस ठाणे स्तरावर प्रलंबित असलेला मुद्देमाल त्याच्या मूळ मालकास परत देण्यात आला.