वाशिम -जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपीट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. जिल्ह्यातील शिरपूर, केनवड, चाडस, काटा,कोंडाळा, परिसरात गारपीट झाली आहे. या गारपीटीमुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत झाडावरचे पोपट मृत्यूमुखी पडल्याचे समोर आले. तर, अनेक पक्षी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पक्षीमित्रांकडून उपचार केले जात आहेत.
गारपिटीमुळे वाशिममध्ये पोपटांचा मृत्यू - वाशिम गारपीट पोपट मृत्यू न्यूज
वातावरणात बदल झाल्याने विदर्भात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. त्यानुसार गेल्या दोन दिवसांपासून विविध ठिकाणी पाऊस कोसळत आहे. वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीट झाली.
पोपट
या अवकाळी पावसासह गारपीटीमुळे काढणीला आलेल्या हळद, हरबरा, गहू या पिकांचे आणि त्यासोबत फळबागांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा संकट आले आहे. जिल्हा प्रशासनाने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत करावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
हेही वाचा -नागपूर आणि वर्ध्यात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस