गोंदिया - जिल्ह्यात भाजपाच्या ओबीसी सेलच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर आक्रोश आंदोलन करण्यात आले. ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याने भाजपाने खासदार सुनील मेंढे आणि माजी मंत्री परिणय फुकेंच्या नेतृवात आक्रोश आंदोलन करण्यात आले.
राज्य सरकारने ओबोसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द करण्यासाठी कट रचला - परिणय फुके
काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ओबोसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द करण्यासाठी कट रचलाय, असा आरोप आमदार परिणय फुके यांनी केला आहे. ते ओबीसी राजीकय आरक्षण रद्द झाल्येने आयोजित करण्या आलेल्या आक्रोश आंदोलनात बोलत होते.
'राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण रद्द' -
राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण रद्द झाल्याचा आरोप भाजपाने केला आहे. सरकारने वेळीच दखल घेतली नाही तर ओबीसी समाज महाविकास आघाडी सरकारला त्यांची जागा दाखवेल, असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला. देशात 52 टक्के ओबीसी असून महाराष्ट्रात 27 टक्के आहे. ओबीसी समाजाला आरक्षण असताना सुद्धा हे आरक्षण घालवण्याचे काम या महाविकास आघाडीच्या सरकारने केला आहे. म्हणून आम्ही ठाकरे सरकार काँग्रेसचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षाच्या सरकारचा निषेध करतो. मात्र, ओबीसीचे आरक्षण घेण्याकरता भारतीय जनता पक्ष सातत्याने संघर्ष करेल असा इशारा ही खासदार सुनील मेंढे यांनी दिला आहे. काँग्रेस पक्षाचे नेते, राष्ट्रवादीचे नेते, शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ओबोसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द करण्यासाठी कट रचला आहे, असा आरोप तथा विधानपरिषद सदस्य डॉ. परिणय फुके यांनी केला आहे.