महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाशिममधील 136 प्रकल्पांपैकी 60 प्रकल्प 100 टक्के भरले; तुडुंब भरून वाहतोय ऊर्ध्व मोरणा प्रकल्प - washim urdhva morna news

जिल्ह्यात मागील 10 दिवसापासून संततधार सुरू आहे. मंगरुळनाथ, मानोरा, आणि मालेगाव तालुक्यात इतर तालुक्याच्या तुलनेत अधिक पाऊस पडत आहे. वाशिम तालुक्यातील 36 प्रकल्पापैकी एकबुर्जी मध्यम प्रकल्प, अनसिंग , बोराळा, खंडाळा, ब्रम्हा, वारा जहागीर, पंचाळा (संग्रा) हे आठ सिंचन प्रकल्प 100 टक्के भरले असून, वाशिम तालुक्यातील सिंचन प्रकल्पात एकूण 43.48 टक्के जलसाठा झाला आहे.

out-of-the-136-projects-60-filled-100-percent-in-washim
136 प्रकल्पंपैकी 60 प्रकल्प 100 टक्के भरले; तुडुंब भरून वाहत आहे ऊर्ध्व मोरणा प्रकल्प

By

Published : Aug 21, 2020, 7:10 AM IST

वाशिम - मागील दहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील 136 प्रकल्पांपैकी 60 प्रकल्प 100 टक्के भरले आहेत. यामुळे मेडशी येथील ऊर्ध्व मोरणा प्रकल्प तुडुंब भरून वाहत आहे. त्याच्या सांडव्यातून वाहणारे पाणी दोन उंच टेकड्यांमधून खाली पडताना नैसर्गिक धबधबा निर्माण होत आहे. मात्र, तो पाहण्यासाठी दरवर्षी होणारी गर्दी यावेळी मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिसून येत नाही.

136 प्रकल्पंपैकी 60 प्रकल्प 100 टक्के भरले; तुडुंब भरून वाहत आहे ऊर्ध्व मोरणा प्रकल्प

जिल्ह्यात मागील 10 दिवसापासून संततधार सुरू आहे. मंगरुळनाथ, मानोरा, आणि मालेगाव तालुक्यात इतर तालुक्याच्या तुलनेत अधिक पाऊस पडत आहे. वाशिम तालुक्यातील 36 प्रकल्पापैकी एकबुर्जी मध्यम प्रकल्प, अनसिंग , बोराळा, खंडाळा, ब्रम्हा, वारा जहागीर, पंचाळा (संग्रा) हे आठ सिंचन प्रकल्प 100 टक्के भरले असून, वाशीम तालुक्यातील सिंचन प्रकल्पात एकूण 43.48 टक्के जलसाठा झाला आहे. मालेगाव तालुक्यात 23 सिंचन प्रकल्प असून, त्यापैकी ब्राम्हणवाडा, कोल्ही, कुर्‍हाळ, मालेगाव, रिधोरा, सोनखास, सुकांडा, खडकी, सुदी, अडोळ, पांग्राबंदी हे प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. एकूण मालेगाव तालुक्यातील सिंचन प्रकल्पात 81.26 टक्के पाणीसाठा आहे. मानोरा तालुक्यात 25 सिंचन प्रकल्प असून, त्यात असोला इंगोले, बोरव्हा, चौसाळा, धानोरा भुसे, फुलउमरी, गारटेक, गिद, गिरोली, कार्ली, रोहणा, रुई, सिंगडोह, वाठोद, हिवरा खु. इगलवाडी, भिलडोंगर, कुपटा हे सिंचन प्रकल्प 100 टक्के भरले आहेत.

तर, रिसोड तालुक्यातील 18 पैकी दोनच प्रकल्प ओव्हर फ्लो झाले असून, त्यामध्ये कोयाळी, वाकद या प्रकल्पाचा समावेश आहे. सद्यस्थितीत या प्रकल्पात 53 टक्के जलसाठा आहे. मंगरुळनाथ तालुक्यात 15 सिंचन प्रकल्प असून, त्यात सोनल या मध्यम प्रकल्पाचा समावेश आहे. त्यातील कोळंबी, मोहरी, मोतसावंगा, नांदखेडा, पिंप्री, सावरगाव, दस्तापूर, जोगलदरी, चोरद, कासोळा हे प्रकल्प काठोकाठ भरले असून, त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कारंजा तालुक्यातील 16 प्रकल्पापैकी दोन प्रकल्पात 100 टक्के जलसाठा असून, त्यात पारव्हा कोहर, किनखेडा या प्रकल्पाचा समावेश आहे. कारंजा तालुक्यातील 16 प्रकल्पात सद्यस्थितीत 56.19 टक्के जलसाठा आहे. सर्वाधिक कमी पाऊस वाशिम तालुक्यात पडला असून, तर मानोरा तालुक्यातील प्रकल्पात 93.54 टक्के जलसाठा आहे. रिसोड व कारंजा तालुक्यातील प्रत्येकी दोन दोन प्रकल्पच 100 टक्के भरले असल्याने या तालुक्यातील प्रकल्पाला दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details