वाशिम- संत्रा तोडणीच्या कामासाठी शेजारच्या जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्यातील पेडगावात आलेली २० मजूर कुटुंब व त्यांची चिमुकली मुले असे एकूण ३१ जण लॉकडाऊनमुळे अडकून पडले आहेत. ठेकेदाराने त्यांना वाऱ्यावर सोडल्याने उपासमारीची वेळ या कुटुंबावर ओढवली होती. मगरुळपीर येथील तहसील कार्यालयाने त्यांच्या जेवणाची सोय केली.
संत्रा तोडणी करणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ; मंगरूळपीर तहसील कार्यालयाने केली जेवणाची सोय - washim
अमरावती जिल्ह्यातील मजूर संत्रा तोडणीसाठी वाशिम जिल्ह्यातील पेडगाव येथे आले होते. लॉकडाऊनच्या काळात त्यांच्या ठेकेदाराने हात झटकल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती.
![संत्रा तोडणी करणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ; मंगरूळपीर तहसील कार्यालयाने केली जेवणाची सोय orange cutting workers hunger problem solved](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6889245-654-6889245-1587528704076.jpg)
ठेकेदाराने या मजुरांना वाऱ्यावर सोडल्याने या सर्वांवर उपासमारीची पाळी आली. हे सर्व मजूर अमरावती जिल्ह्यातील मानशू येथील आहेत. पोटापाण्यासाठी रोजगारानिमित्त ते सतत भटकंती करतात. हे मजूर संत्रा तोडणीच्या कामासाठी घरदार सोडून मुलाबाळांसह वाशिम जिल्ह्यातील पेडगाव येथे दाखल झाले होते.
हातावरच पोट घेऊन ठिकठिकाणी फिरणाऱ्या मजुरांवर वाईट वेळ आली होती. मात्र, मंगरुळपीर तहसीलदार यांनी केलेल्या प्रयत्नामुळे त्यांना शेतशिवारातच दोन वेळेच्या जेवणाची सोय करून त्या मजुरांना आधार दिला देण्यात आला.