वाशिम - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे लग्न करणाऱ्यांची मोठी पंचाईत झाली, लग्नसमारंभ होतील का नाही? असा प्रश्न निर्माण झाला. मात्र, दोन्ही पक्षांकडून समन्वय साधत मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नसोहळा उरकला.
वाशिममध्ये कोरोनामुळे आटोपले पाच पाहुण्यांत लग्न.. - latest washim news
दोन्ही परिवाराने संगनमत करून दोन्ही कुटुंबातील पाच सदस्य घेऊन गावातील नदीकाठी एका मंदिरात साध्या पद्धतीने लग्न उरकून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
वाशिम
जिल्ह्यातील येवती येथील परमेश्वर शिंदे यांचा विवाह मालेगाव तालुक्यातील तिवळी येथील विद्या गिरहे या मुलीशी ठरला होता. मात्र, दोन्ही परिवाराने संगनमत करून दोन्ही कुटुंबातील पाच सदस्य घेऊन गावातील नदीकाठी एका मंदिरात साध्या पद्धतीने लग्न उरकून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.