महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना : अत्यंत आवश्यकता असेल तरच कार्यालयात या, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश - washim corona news

लोकांनी एकत्र येवून गर्दी केल्यास या विषाणूचा फैलाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांची गर्दी होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून अत्यंत आवश्यकता असेल तरच नागरिकांनी कार्यालयात यावे.

वाशिम
वाशिम

By

Published : Mar 18, 2020, 1:41 PM IST

Updated : Mar 18, 2020, 2:03 PM IST

वाशिम - ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. लोकांनी एकत्र येवून गर्दी केल्यास या विषाणूचा फैलाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांची गर्दी होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून अत्यंत आवश्यकता असेल तरच नागरिकांनी कार्यालयात यावे. अन्यथा शासकीय कार्यालयात येणे टाळावे, असे आदेश कोरोना प्रतिबंधक उपाय योजनांचे नोडल अधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी हृषिकेश मोडक यांनी दिले आहेत. तसेच सामूहिक निवेदने, अर्ज, तक्रारी, फिर्याद कार्यालयास प्रत्यक्ष येवून सादर करून नये, असेही या आदेशात म्हटले आहे.

वाशिम

हेही वाचा -Coronavirus : माळढोक अभयारण्य पर्यटकांसाठी बंद, सोलापुरातील उद्यानेही 31 मार्चपर्यंत बंद

‘कोरोना’चा फैलाव टाळण्यासाठी गर्दीवर प्रतिबंध करणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी होऊन या विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी सुरक्षिततेच उपाय म्हणून जिल्ह्यातील नागरिकांनी प्रत्यक्ष जिल्हाधिकारी कार्यालयात न येता आपली निवेदने, अर्ज, तक्रारी, तक्रार coll_washim@rediffmail.com, rdc_washim@rediffmail.com, rdcwashim@gmail.com किंवा elokshahiwashim@gmail.com या ई-मेलवर किंवा ८३७९९२९४१५ या व्हॉटसअप क्रमांकावर पाठवावी अथवा वैयक्तिक अर्ज, निवेदन, तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवक-जावक विभागात परस्पर द्यावीत. सामूहिक निवेदने, अर्ज, तक्रारी प्रत्यक्ष येवून सादर करण्यात येवू नये. नागरिकांना काही अडचणी असल्यास त्यांनी ०७२५२-२३३४००, ०७२५२-२३३६५३, ०७२५२-२३२८५८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे जिल्हा दंडाधिकारी यांनी दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Last Updated : Mar 18, 2020, 2:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details