वाशिम- शहरातील पाटणी चौकात देशी दारूच्या दुकानात एका युवकाने वाद घालून देशी दारूचे दुकान जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना काल (शनिवारी) घटली असून ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
पाटणी चौकात देशी दारूच्या दुकानामध्ये काही दिवसांपूर्वी आकाश गवळी या युवकांशी वाद झाला होता. त्यामुळे या युवकाने पूर्वी दुकान मालकावर चाकू हल्ला केला होता. त्यानंतर दुकान मालक गोपाल जयस्वाल यांनी पोलिसात तक्रार दिली म्हणून हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.