वाशिम - कारंजा तालुक्यातील येवताबंदी येथे एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना काल (बुधवारी) सकाळच्या सुमारास उघडकीस आली. संदीप अवधुतराव बान्ते (वय ३० वर्षे) असे त्या युवकाचे नाव आहे.
वाशिम येथे ३० वर्षीय युवकाची आत्महत्या, गळफास घेऊन संपविले जिवन
कारंजा तालुक्यातील येवताबंदी येथे एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली असून आतहत्येचे कारण समजू शकले नाही.
घटनास्थळावरी छायाचित्र
संदीप बान्तेने गावालगतच असलेल्या सोपीनाथ महाराज संस्थान मंगल कार्यलयाच्या स्वयंपाकगृहाच्या समोरील भागात गळफास घेऊन जीवन यात्रा संपवीली. मृत संदीपच्या पश्चात एक बहीण, दोन भाऊ व वडील असा परिवार असून संदीप हा सर्वात लहान असून अविवाहित होता. मोलमजुरी करून तो आपला चरितार्थ चालवित होता .त्याच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही.