वाशिम येथे विजेच्या धक्क्याने व्यक्तीचा मृत्यू - washim death
वाशिम जिल्ह्यातील अनसिंग येथे शृंगऋषी कॅालनीमध्ये एका इसमाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी (मंगळवार) घडली.
वाशिम येथे विजेच्या धक्क्याने इसमाचा मृत्यू
वाशिम -जिल्ह्यातील अनसिंग येथील शृंगऋषी कॅालनीमध्ये एका व्यक्तीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. पाणी भरताना पाण्याच्या मोटरपंपमध्ये विद्यूतप्रवाह उतरल्यामुळे शेषराव शामा राठोड (वय, ५२ वर्षे) यांचा मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी (मंगळवार) घडली.