वाशिम - रिसोड शहरात वास्तव्यास असलेल्या सुमित दीपक अंभोरे या 33 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली.
33 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या; वाशिम मधील घटना - washim crime news
रिसोड शहरात वास्तव्यास असलेल्या सुमित दीपक अंभोरे या 33 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली.

सुमित अंभोरे हा शुक्रवारी रात्री 10 वाजल्यानंतर स्वत:च्या खोलीत झोपण्यासाठी गेला होता. सकाळी उशिरापर्यंत न उठल्याने कुटुंबियांनी दरवाजा ठोठावला. मात्र, आतमधून कोणतीही प्रतिक्रिया न आल्याने त्यांनी दरवाजा तोडला. यावेळी सुमितचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत होता.
या आत्महत्येमागील कारण अद्यापही अस्पष्ट आहे. विशेष म्हणजे सुमितला गुरुवारी पुत्ररत्न प्राप्त झाल्याने तो माहेरी असलेल्या पत्नीला भेटण्यासाठी नांदेडला गेला होता. यानंतर अचानक घडलेल्या या प्रकारामुळे कुटुंबातील सर्वांना धक्का बसला आहे. रिसोड पोलीस या प्रकरणासंबंधी पुढील तपास करत आहेत.