वाशिम- जिल्ह्यातील रिसोड येथील अभिजित सावळकर याच्या घरातून काळविटांची कातडी सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
रिसोड येथे काळविटांच्या 3 कातडींसह आरोपी अटक - Imran Khan
वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील अभिजित सावळकर याच्या घरातून काळविटांची कातडी सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
जप्त केलेल्या कातड्यासह पोलीस पथक
उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. पवनकुमार बन्सोड यांच्या नेतृत्वात ठाणेदार अनिल ठाकरे यांनी आज शोध मोहिम राबवून रिसोड येथील अभिजित सावळकर याच्या घरातून ३ काळविटांची कातडी जप्त केली. याप्रकरणी अभिजित सावळकर यास अटक करण्यात आली आहे.
सध्या वन्य प्राण्यांच्या शिकारीचे प्रमाण वाढले असून या प्रकरणात किती आरोपी आहेत त्याचा तपास पोलीस व वनविभाग करत आहे.