वाशिम -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांसोबत शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात 39वर पारा गेला असून आज मंगरूळपीर तालुक्यातील वनोजा चेकपोस्टवर कर्तव्यावर असलेले शिक्षक संजय ठाकरे यांना अचानक भोवळ येऊन जमिनीवर कोसळल्याने एकच धावपळ उडाली.
वनोजा चेकपोस्टवर कर्तव्यावर असलेल्या शिक्षकाला भोवळ; उपचारासाठी रुग्णालयात दाखल - corona in washim
जिल्ह्यात 39वर पारा गेला असून आज मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा चेकपोस्टवर कर्तव्यावर असलेले शिक्षक संजय ठाकरे यांना अचानक भोवळ येऊन जमिनीवर कोसळल्याने एकच धावपळ उडाली.
![वनोजा चेकपोस्टवर कर्तव्यावर असलेल्या शिक्षकाला भोवळ; उपचारासाठी रुग्णालयात दाखल](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7018776-116-7018776-1588334042120.jpg)
वनोजा चेकपोस्टवर कर्तव्यावर असलेल्या शिक्षकाला भोवळ; उपचारासाठी रुग्णालयात दाखल
मात्र त्यांच्यासोबत असलेले शिक्षक, पोलीस आणि राजमुद्रा ग्रुपच्या सदस्यांनी तत्काळ शेलुबाजार येथील प्राथमिकआरोग्य केंद्रात त्यांना दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम येथे दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत.
दरम्यान, डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.