वाशिम - दुष्काळाची झळ सोसणाऱ्या राज्यातील गावात पाणी फाऊंडेशनच्या वतीने वॉटर कप स्पर्धा राबविली जात आहे. वाशिम जिल्ह्यातील चकवा या गावाने सहभाग नोंदविला असून, गाव पाणीदार व्हावे, हा दृष्टिकोन समोर ठेवून चकवा येथील राजकन्या मनवर या ६५ वर्षीय वयोवृद्ध आजीबाईने हातात कुदळ, फावडे घेऊन गावशिवारात शेततळ्याचे काम सुरू केले आहे. इतरांसाठी ही प्रेरणादायी बाब असून राजकन्या मनवर यांच्या कार्याचे सर्वत्र कौतूक होत आहे.
पाणीदार गावासाठी आजीबाईने हाती घेतली कुदळ.. - foundation
गावात पाणीटंचाई पाचवीलाच पुंजलेली आहे. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात मैलोन-मैल पाण्यासाठी होणारी भटकंती थांबावी आणि माझे गाव पाणीदार व्हावे हे स्वप्न उराशी बाळगून ६५ वर्षीय राजकन्या मनवर यांनी शेततळे खोलीकरणाचे काम सुरू केले आहे.
पाणीदार गावासाठी आजीबाईने हाती घेतली कुदळ..
मंगरुळपीर तालुक्यातील चकवा हे ४१६ लोकसंख्या असलेले छोटेसे गाव आहे. गावात पाणीटंचाई पाचवीलाच पुंजलेली आहे. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात मैलोन-मैल पाण्यासाठी होणारी भटकंती थांबावी आणि माझे गाव पाणीदार व्हावे हे स्वप्न उराशी बाळगून ६५ वर्षीय राजकन्या मनवर यांनी शेततळे खोलीकरणाचे काम सुरू केले आहे. या आजीने सुरू केलेले काम सर्वांना लाजवेल अशीच आहे. इतरांसाठी प्रेरणादेणारी ही बाब असल्याने आजीचे सर्वत्र कौतुक होत आहे.