वाशिम - शिवसेना खासदार भावना गवळी यांच्याशी संबंधित आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर (फेसबुक) टाकण्यात आली आहे. या प्रकरणी मंगरूळपीर पोलिसांनी कारंजा येथील एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विवेक नाकाडे (रा. मंगरुळपीर) यांनी ही तक्रार दाखल केली आहे.
सोशल मीडियावर खासदार भावना गवळी यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह पोस्ट; गुन्हा दाखल - SHIVSENA
सोशल मीडियावर शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या संदर्भात आक्षेपार्ह पोस्ट.... वाशिमच्या कारंजामध्ये घडली घटना.... आरोपी साद पठाण विरोधात मंगरुळ पोलिसात तक्रार दाखल
खा.भावना गवळी
तक्रारदार नाकाडे व त्यांचा मित्र जुबेर मोहनावाले हे खासदार भावना गवळी यांच्यासंदर्भात फेसबुकवरील पोस्ट, कॉमेन्ट पाहत होते. त्यावेळी त्यांना आरोपी साद पठाण याने खासदार गवळी यांच्या संदर्भात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचे आढळून आले. त्यानतंर नाकाडे यांनी तत्काळ मंगरुळपीर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी तंत्रज्ञान कायदा कलम तसेच भादंवि कलम ५०१ नुसार गुन्हा दाखल केला आहे