महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाशिम : आज रविवारी लोकडाऊन नसल्याने बाजारपेठेत मोठी गर्दी, कोरोना नियमांना हरताळ - वाशिममध्ये लॉकडाऊन

आजपासून वाशिम जिल्ह्यातील रविवारचा लॉकडाऊन हटविण्यात आल्यानं वाशिम शहरातील बाजारपेठेत सकाळी 9 वाजल्यापासून नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं दिसून आली. कोरोनाच्या सर्व उपाययोजनांना हरताळ फासला जात आहे.

no lockdown on Sunday in washim
no lockdown on Sunday in washim

By

Published : Mar 14, 2021, 8:37 PM IST

Updated : Mar 14, 2021, 8:43 PM IST

वाशिम -आजपासून वाशिम जिल्ह्यातील रविवारचा लॉकडाऊन हटविण्यात आल्यानं वाशिम शहरातील बाजारपेठेत सकाळी 9 वाजल्यापासून नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं दिसून आली. कोरोनाच्या सर्व उपाययोजनांना हरताळ फासला जात आहे. बाजारातील दुकाने आणि प्रतिष्ठानांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असताना देखील दुकानदार आणि ग्राहक कोणतीही खबरदारी घेताना दिसून येत नाहीत.

रविवारी लोकडाऊन नसल्याने बाजारपेठेत मोठी गर्दी
वाशिम जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत असून गर्दी टाळण्यासह मास्कचा वापर आणि सोशल डिस्टनसिंग पाळण्याचं आवाहन करण्यात येत असलं तरी नागरिक मात्र बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असल्याचे दिसून येत आहे.हे ही वाचा - मोदी-शाह यांचे सरकार ईडी आणि सीबीआयवर टिकून - भालचंद्र मुणगेकर

वाशिम जिल्ह्यात दरदिवशी कोरोना रुग्ण संख्या 100 च्या वर -

वाशिम जिल्ह्यात कोरोना रूग्णच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. मात्र नागरिक याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. वाशिम जिल्ह्यात दरदिवशी 100 वर कोरोना रुग्ण आढळत आहे विनाकारण नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने केले जात असले तरी नागरिक याकडे लक्ष देत नाही.

Last Updated : Mar 14, 2021, 8:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details