वाशिम -जिल्हा वासियांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील एकमेव कोरोना रुग्ण असलेल्या त्या वृद्धाचा 20 व्या दिवसाचा 4 था आणि 21 व्या दिवसाचा 5 वा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अंबादास सोनटक्के यांनी ही माहिती दिली. यामुळे जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण नाही.
वाशिम जिल्ह्यात एकही कोरोना बाधित नाही; 'त्या' रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह
जिल्हा वासियांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील एकमेव कोरोना रुग्ण असलेल्या त्या वृद्धाचा 20 व्या दिवसाचा 4 था आणि 21 व्या दिवसाचा 5 वा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी सर्वत्र संचारबंदी लागू आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून काटेकोरपणे नियमांची अंमलबजावणी केली जात आहे. तर जिल्ह्यातील आरोग्यसेवक, पोलीस प्रशासन, आणि स्वच्छता कर्मचारी दिवसरात्र कोरोनाविरोधात लढा देत आहेत. त्यांच्या या कामाला आता यश येताना दिसून येत आहे.
राज्यात गुरूवारी कोरोनाबाधित ७७८ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ६४२७ झाली आहे. गुरुवारी ५१ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत राज्यभरात ८४० रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ५३०४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी दिली.