महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाशिममध्ये एका दिवसात 7 'पॉझिटिव्ह'; बाधितांचा आकडा 48 वर

वाशिममधील कोरोनाबाधितांची संख्या दररोज वाढत आहे. आज एका दिवसात जिल्ह्यात सात पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यामध्ये एका 15 वर्षांच्या मुलीचा समावेश आहे.

By

Published : Jun 13, 2020, 6:52 PM IST

washim covid news
वाशिममध्ये एका दिवसात 7 'पॉझिटिव्ह'; बाधितांचा आकडा 48 वर

वाशिम - आज जिल्ह्यात एकाच दिवसात सात कोरोनाबाधित सापडल्याचे समोर आले आहे. बोराळा हिस्से येथील 32 वर्षाच्या महिलेचा अहवाल 'पॉझिटिव्ह' आला असून 10 जूनला सापडलेल्या बाधितांच्या संपर्कात आल्याने बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

वाशिममध्ये एका दिवसात 7 'पॉझिटिव्ह'; बाधितांचा आकडा 48 वर

कारंजा लाड विश्रामगृह परिसरातील कोरोनाबाधित व्यक्तीच्या नजीकच्या संपर्कातील 45 वर्षीय महिला व 15 वर्षीय युवतीला देखील संसर्ग झाला. औरंगाबादेतून रिसोड येथे आलेल्या 20, 24 आणि 27 वर्षांच्या युवकांच्या चाचण्या देखील 'पॉझिटिव्ह' आल्या आहेत.

मंगळूरपीर तालुक्यातील शेलुबाजार येथे 65 वर्षाच्या व्यक्तीला कोरोनाचे निदान झाले आहे. या व्यक्तीला कोरोनाची लक्षणे असल्याने खासगी रुग्णालयातून 'रेफर' करण्यात आले होते. जिल्ह्यात एकूण 48 कोरोनाबाधित सापडले असून आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे, तर सात जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला. संबंधितांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्याने ते कोरोनामुक्त झाले आहेत. सद्या 39 अ‌ॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details