वाशिम - जिल्ह्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. आज (मंगळवार) दिवसभरात १३ रुग्णांना जरी डिस्चार्ज देण्यात आला असला, तरीही नवीन २१ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 414 वर पोहोचली आहे. तर 9 जणांचा आजवर कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 222 रुग्णांवर वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयातील केविड सेंटर मध्ये उपचार सुरू आहे.
दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या १३ व्यक्तींना आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये वाशिम शहरातील गंगू प्लॉट येथील ४, कसाबपुरा येथील १, हिवरा रोहिला (ता. वाशिम) येथील ४, कारंजा लाड शहरातील सिंधी कॅम्प येथील १ व कामरगाव (ता. कारंजा लाड) येथील ३ व्यक्तींचा समावेश आहे.
वाशिममध्ये मंगळवारी 21 नव्या कोरोना रुग्णांची नोंद... हेही वाचा -राज्यात आज आठ हजार नव्या रुग्णांसह २४६ मृत्यूंची नोंद; तर सात हजार रुग्णांना डिस्चार्ज..
आज (मंगळवार) सायंकाळपर्यंत प्राप्त अहवालानुसार मांगवाडी (ता. रिसोड) येथील ११, मंगरूळपीर शहरातील माळीपुरा येथील १, कारंजा लाड शहरातील इंगोले प्लॉट येथील १ आणि वाशिम नगरपरिषद परिसरातील १, वाल्हई (ता. कारंजा लाड) येथील १, मालेगाव शहरातील भावसार गल्ली परिसरातील २ आणि गांधीनगर परिसरातील १, इराळा (ता. मालेगाव) येथील १, शिरपूर जैन (ता. मालेगाव) येथील १ व्यक्ती, असे एकूण 21 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याचे निष्पन्न झाले आहे. वाशिम शहरातील गुप्ता ले-आऊट, हिंगोली नाका परिसरातील १ व्यक्ती अकोला येथे कोरोनाबाधित आढळून आला आहे.