वाशिम- जिल्ह्यात नवीन 20 व्यक्ती कोरोनाबाधित आढळले आहे. तर एकूण 188 रुग्णांवर वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. कोरोनावर मात केलेल्या 27 रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
वाशिम: जिल्ह्यात 20 नवे कोरोनाबाधित; 188 जणांवर उपचार सुरू - corona deaths in Washim
वाशिम तालुक्यातील ६, मंगरुळपीर तालुक्यातील 6, कारंजा लाड तालुक्यातील १ आणि रिसोड तालुक्यातील १४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
नवीन कोरोना रुग्णांमध्ये वाशिम शहरातील नवोदय विद्यालय परिसरातील ३० वर्षीय पुरुष, कारंजा लाड शहरातील शांती नगर परिसरातील ३० वर्षीय महिला, वापटी-कुपटी (ता. कारंजा लाड) येथील ३२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. याचबरोबर मालेगाव शहरातील गांधी नगर परिसरातील ३२ वर्षीय महिला व १० वर्षीय मुलगा, नांदगाव (ता. मंगरूळपीर) येथील २२ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. जिल्ह्याबाहेरील एकूण ५ जण कोरोनाबाधित आढळले आहेत.
वाशिम तालुक्यातील ६, मंगरुळपीर तालुक्यातील 6, कारंजा लाड तालुक्यातील १ आणि रिसोड तालुक्यातील १४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
बुधवारी उशिरा रात्री ४७ व्यक्तींचे कोरोना चाचणीचे अहवाल मिळाले. त्यापैकी ३९ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आहेत. तर ८ व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे अहवालातून दिसून आले. यामध्ये वाशिम शहरातील चांडक ले-आऊट परिसरातील ४७ वर्षीय महिला व २९ वर्षीय पुरुष, कळंबा महाली (ता. वाशिम) येथील ३६ वर्षीय पुरुष, नांदगाव (ता. मंगरूळपीर) येथील ४० व ३० वर्षीय महिला यांचा समावेश आहे. तर शेलूबाजार (ता. मंगरूळपीर) येथील ६७ वर्षीय पुरुष, कारंजा लाड शहरातील सिंधी कॅम्प परिसरातील १३ वर्षीय मुलगी,३० वर्षीय पुरुष व रिसोड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिसरातील ४७ वर्षीय पुरुष यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे.
जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 432 झाली आहे. तर कोरोनाने 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आजपर्यंत एकूण 235 जणांना बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.