महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अभिनव शेती... एक एकर कलिंगडाच्या शेतीतून 3 लाखांचे उत्पन्न, 2 लाखांचा निव्वळ नफा - watermelon corp at washim

वाशिम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील नंधाना येथील राजु आप्पा त्र्यंबक जिरवणकर या शेतकऱ्याने कलिंगडाच्या पिकातून 2 लाखांचा निव्वळ नफा मिळवला आहे. त्यांनी यांनी यंदा 1 एकरात शुगर क्वीन जातीच्या कलिंगडाची लागवड केली होती.

washim
कलिंगडाच्या शेतीतून 2 लाखांचा निव्वळ नफा

By

Published : Feb 11, 2020, 11:16 AM IST

Updated : Feb 11, 2020, 1:49 PM IST

वाशिम - जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील नंधाना येथील राजु आप्पा त्र्यंबक जिरवणकर या शेतकऱ्याने कलिंगडाच्या पिकातून 2 लाखांचा निव्वळ नफा मिळवला आहे. जिरवणकर यांच्याकडे वडिलोपार्जित 14 एकर शेती आहे. शेतात वर्षभर पाण्याची सोय असूनही सोयाबीन, हरभरा आणी उन्हाळी भुईमुग हे तीन पिक ते घ्यायचे. मात्र, तीन पिके घेवूनही उत्पादन खर्च आणि वातावरणातील बदलामुळे शेती परवडत नव्हती.

कलिंगडाच्या शेतीतून 2 लाखांचा निव्वळ नफा

हेही वाचा -वाशिममध्ये 'काळामाथा' यात्रेत महाप्रसाद वाटप, दर्शनासाठी भाविकांची गर्दी

जिरवणकर यांनी यंदा 1 एकरात शुगर क्वीन जातीच्या कलिंगडाची लागवड केली. यापासून त्यांना 3 लाख रुपये मिळणार आहेत. एक लाख रुपये लागवड खर्च वगळता 2 लाख रुपये निव्वळ नफा होणार असल्याचे ते सांगत आहे. आपल्या कमी शेतीत चांगले उत्पन्न घेणार असल्याने इतरांसमोर या शेतकऱ्यांने एक आदर्श ठेवला आहे.

Last Updated : Feb 11, 2020, 1:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details