वाशिम - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांविरोधात 'ईडी'ने गुन्हा दाखल केल्याने संपूर्ण राज्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे चित्र आहे. ईडीच्या या कारवाईच्या निषेधार्थ जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्य सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
ईडी कारवाई प्रकरणी राष्ट्रवादी आक्रमक; घोषणाबाजी करत जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन - वाशिम राष्ट्रवादी कॉंग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांविरोधात 'ईडी'ने गुन्हा दाखल केल्याने संपूर्ण राज्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे चित्र आहे.
शरद पवार यांच्यासह माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांविरोधात 'ईडी'ने गुन्हा दाखल केल्याने वाशिममध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले
राष्ट्रवादी काँग्रेस यापुढे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये धरणे आंदोलन करणार असल्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत दादा ठाकरे यांनी यावेळी सांगितले. आत्ता फक्त जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन रोष व्यक्त करत असल्याचे ते म्हणाले. राज्य सरकारच्या या सुडाच्या राजकारणाविरोधात आंदोलन तीव्र करणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.