वाशिम - भारतीय संस्कृतीचा वारसा अनेक सणांच्या माध्यमातून आपण सर्वांनी जपला आहे. देशातीलच नव्हे, तर विदेशात गेलेले भारतीय देखील संस्कृतीचे पालन आणि जतन करण्यासाठी योगदान देत आहेत. वाशिम जिल्ह्यातील नितीन शालीग्राम घोडे यांनी अमेरीकेत भारतीयांना जमा करून होळी साजरी केली आहे.
वाशिमकरांनी विदेशातही जपली होळीची परंपरा
आपल्या देशातीलच नव्हे तर विदेशात गेलेले भारतीय देखील संस्कृतीचे जतन करण्यासाठी योगदान देत आहेत. वाशिम जिल्ह्यातील नितीन शालीग्राम घोडे यांनी अमेरिकेत भारतीयांना जमा करून होळी साजरी केली आहे.
अमेरिकेत होळी
मूळचे शेलूबाजार येथील रहिवासी असलेले नितीन घोडे हे नोकरीच्या निमित्ताने अमेरीकेतील अटलांटा शहरात आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहेत. अमेरिकेत राहूनही आपले भारतीय सण ते तेथे साजरे करतात. होळीच्या निमित्ताने अटलांटा येथील राम मंदिरात होळी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी रहिवासी असलेल्या असंख्य भारतीयांनी राममंदिर परिसरात विधीवत पूजा करून होळीचे दहन केले.
हेही वाचा -अयोध्येच्या राममंदिरासाठी एक कोटी; रामटेकच्या गडमंदिराच्या निधीत मात्र कपात'
Last Updated : Mar 10, 2020, 8:25 PM IST