वाशिम - शहरात राष्ट्रीय बाल हक्क आयोगाच्या वतीने विभागीय स्तरावर एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. बालकांवर होणारे अत्याचार, त्यांच्या अधिकारांचे उल्लंघन या विषयीच्या तक्रारींच्या निवारणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात गुरुवारी हे शिबीर पार पडले.
राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगामार्फत एकदिवसीय तक्रार निवारण शिबीर संपन्न - one day complaint resolve camp
शिबिरात सकाळी ९ वाजल्यापासून तक्रारींची नोंदणी सुरु झाली. तसेच सकाळी १० च्या सुमारास सुनावणीला सुरुवात झाली होती. यामध्ये अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील बालकांनी आपल्यावरील अन्यायाविरुद्ध दाद मागितली.

शिबिरात सकाळी ९ वाजल्यापासून तक्रारींची नोंद करून घेण्यात आल्या. तसेच सकाळी १० च्या सुमारास सुनावणीला सुरुवात झाली. यामध्ये अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील बालकांनी आपल्यावरील अन्यायाविरुद्ध दाद मागितली.
या शिबिरासाठी पाच जिल्ह्यातील बालके, त्यांचे पालक तसेच शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्य वासंती देशपांडे, विजय जाधव, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.