महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

श्री क्षेत्र डव्हा येथील नाथनंगे महाराजांच्या यात्रेला सुरुवात, लाखो भाविक दाखल - श्री क्षेत्र डव्हा येथील नाथनंगे महाराज यात्रा

विदर्भाची अध्यात्मिक काशी म्हणून ओळख असलेल्या वाशिम जिल्ह्यातील श्रीक्षेत्र डव्हा येथील नाथनंगे महाराजांच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली. यात्रेनिमित्त लाखो भाविक डव्हा येथे दाखल झाले आहेत.

Nathnage maharaj yatra start in washim
श्री क्षेत्र डव्हा येथील नाथनंगे महाराजांच्या यात्रेला सुरुवात

By

Published : Feb 2, 2020, 10:01 PM IST

वाशिम -श्री क्षेत्र डव्हा येथील नाथनंगे महाराजांच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. यात्रेनिमित्त लाखो भाविक संतनगरीत दाखल झालेत. यात्रेत 200 क्विंटल महाप्रसादाचे एकाच वेळी वाटप करण्यात आले. यावेळी दीड लाखांहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

श्री क्षेत्र डव्हा येथील नाथनंगे महाराजांच्या यात्रेला सुरुवात

विदर्भाची अध्यात्मिक काशी म्हणून ओळख असलेल्या वाशिम जिल्ह्यातील श्रीक्षेत्र डव्हा येथील नाथनंगे महाराजांच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली. ७ दिवस चालणाऱ्या या यात्रेला विदर्भासह पंचक्रोशीतील लाखो भक्त दर्शनासाठी दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे एकाच वेळी 200 क्विंटल महाप्रसादाचे वितरण करण्यात आले असून, एक लाखाहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

मालेगाव तालुक्यातील डव्हा येथे मागील अनेक वर्षांपासून शिष्य असलेले विश्वनाथ महाराज यांनी सुरू केलेली परंपरा आजही कायम आहे. यंदाही भव्य यात्रा महोत्सवाला धडाक्यात सुरुवात झाली. यावेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. 50 ट्रॅक्टरद्वारे 200 क्विंटल महाप्रसादाचे वितरण यावेळी करण्यात आले. पुरी, बटाट्याची भाजी बुंदी असा महाप्रसाद देण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details