महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपूर-औरंगाबाद महामार्गावरील काटेपूर्णा पूल ठरतोय अपघाताचा केंद्र - वाशिम लेटेस्ट न्यूज

जऊळका रेल्वे येथिल काटेपूर्णा पूल 1984 मध्ये वाहुन गेला होता. काटेपूर्णा नदीवरील पुलावर पडलेल्या खड्ड्यांंमुळे अनेकवेळा अपघात घडले असून या अपघातामुळे अनेकांना अपंगत्व आले आहे. याबाबत संबंधित विभागाने दखल न घेतल्यामुळे येथे अपघात होण्याची मालिका सुरूच असल्याचा आरोप नागरिकांकडून सातत्याने केला जात आहे.

काटेपूर्णा पूल
काटेपूर्णा पूल

By

Published : Jul 14, 2021, 7:43 PM IST

Updated : Jul 14, 2021, 8:02 PM IST

वाशिम - जिल्ह्यातील जऊळका रेल्वेच्या गेटक्रमांक 102 औरंगाबाद-नागपूर सुपर हायवे रोडवरील काटेपूर्णा नदीवरील पूल हा अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे. या पुलाची गंभीर अवस्था झाल्यामुळे पुलावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने हा महामार्ग अपघाताला आमंत्रण देणारा ठरतो आहे. नुकतेच आज(बुधवार) दुचाकीचा झालेला अपघात कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

काटेपूर्णा पूल ठरतोय अपघाताचा केंद्र


रस्त्याची दुरावस्था

काही दिवसापूर्वी याच पुलावरून ट्रक पाण्यात पडला होता. तेव्हा चार ते पाच दिवस मृतदेह काढण्यासाठी लागले होते. काटेपूर्णा नदीवर लघुसिंचन विभागाचे चाका प्रकल्प सुद्धा आहे. या पुलाची उंची वाढविण्याची आवश्यकता असून त्यामुळे या प्रकल्पाच्या पाण्याची पातळी वाढवता येते नाही. या पुलाच्या कामाकरून सिंचन विभाग आणि रस्ते दुरूस्ती विभागामध्ये वाद असल्याचे बोलल्या जात आहे.

अपघाताला आमंत्रण देणारा पूल

जऊळका रेल्वे येथिल काटेपूर्णा पूल 1984 मध्ये वाहुन गेला होता. काटेपूर्णा नदीवरील पुलावर पडलेल्या खड्ड्यांंमुळे अनेकवेळा अपघात घडले असून या अपघातामुळे अनेकांना अपंगत्व आले आहे. याबाबत संबंधित विभागाने दखल न घेतल्यामुळे येथे अपघात होण्याची मालिका सुरूच असल्याचा आरोप नागरिकांकडून सातत्याने केला जात आहे. याच रस्त्यावरून शाळकरी विद्यार्थांनाही दररोज प्रवास करावा लागतो. त्यामुळे पुलाच्या झालेल्या अवस्थेवर पालकांनाही शासनावर ताशेरे ओढले आहे. पावसामुळे या पुलाची अवस्था सद्यस्थितीत अत्यंत ढसाळ झाली असून प्रशासन या पुलाकडे कधी लक्ष देणार? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

Last Updated : Jul 14, 2021, 8:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details