महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाशिम जिल्ह्यात मुसळधार पाऊस: पुरामुळे नागपूर-औरंगाबाद महामार्ग तासभर बंद - monsoon rain Washim

जिल्ह्यातील नागपूर-औरंगाबाद हा द्रुतगती मार्ग पुरामुळे बंद झाला होता. त्यामुळे तब्बल गेल्या एक तासापासून वाहतूक ठप्प झाली होती. पूल खचल्यामुळे वाहनाच्या दोन्ही बाजुंनी रांगा लागल्याचे अनेक व्हिडीओ समोर येत आहेत.

floods in Washim
वाशिम जिल्ह्यात मुसळधार पाऊस

By

Published : Jun 10, 2021, 10:33 PM IST

Updated : Jun 10, 2021, 10:44 PM IST

वाशिम- जिल्ह्यात दुपारपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यातच पहिल्या पावसात मानोरा तालुक्यातुन वाहणारी अरुणावती नदी दुथडी भरून वाहत आहे. वाशिम जिल्ह्यातून नागपुर- औरंगाबाद दृतगती मार्गावर येडशी फाट्यानजीकच्या मरिमाता मंदिराजवळील पूल खचल्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता.

मुसळधार पावसामुळे नदी व नाले तुडूंब भरले आहेत. काही शेतातच बांध फुटल्याने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वाशिम जिल्ह्यातून नागपूर- औरंगाबाद महामार्गावर येडशी फाट्यानजीकच्या मरिमाता मंदिराजवळील पूल खचल्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला.

पुरामुळे नागपूर-औरंगाबाद महामार्ग तासभर बंद

हेही वाचा-गुरुजी तुम्ही सुद्धा... जुगार खेळताना 4 शिक्षकांसह 9 जणांना अटक

पूल खचल्यामुळे वाहनांच्या दुतर्फा रांगा-

जिल्ह्यातील नागपूर-औरंगाबाद हा द्रुतगती मार्ग पुरामुळे बंद झाला होता. त्यामुळे तब्बल गेल्या एक तासापासून वाहतूक ठप्प झाली होती. पूल खचल्यामुळे वाहनाच्या दोन्ही बाजुंनी रांगा लागल्याचे अनेक व्हिडीओ समोर येत आहेत. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी आज दुपारपासून विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस पडत आहे. हा मान्सूनमधील पहिलाच जोरदार पाऊस असल्याने अनेक नदी व नाले दुथडी भरून वाहत आहेत.

हेही वाचा-शेत तळ्यात बुडून बाप-लेकासह एकाचा मृत्यू; गेवराई तालुक्यातील दैठणा येथील घटना

Last Updated : Jun 10, 2021, 10:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details