वाशिम -मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालय ( Matoshree Shantabai Gote College ) केंद्रावर रविवार दि.17 जुलैला NEET चा पेपर घेण्यात आला. यावेळी हजारो विद्यार्थ्यांनी पेपर दिला, मात्र मुस्लिम विद्यार्थिनींना चेहरा व हॉल टिकिट दाखविल्या नंतर ही हिजाब व बुरखा श्कार ( Hijab ) ढण्यास सांगण्यात आले असल्याचा आरोप मुस्लिम विद्यार्थिनी व त्यांच्या पालकांनी केला आहे. या प्रकरणी वाशिम पोलीसांत तक्रार देण्यात आली आहे.
Washim Hijab controversy - विद्यार्थिनींने हिजाब घातल्याने परीक्षा केंद्रावर प्रवेश नाकारला - वाशिम मुस्लीम विद्यार्थीनींनी हिजाब घालून प्रवेश नाही
बुरखा घालून आधी परीक्षा कक्षात येण्यास मज्जाव करण्यात आला. नंतर हिजाब ( Hijab ) काढून टाका असे सांगून बाहेर पाठवण्यात आले. बराच वादावादी झाल्यानंतर शेवटी रस्त्यावर बुरखा काढण्यात आला. परीक्षा कक्षात ही उपस्थित शिक्षकाचा वर्तन योग्य नसल्याचेही पीडित विद्यार्थिनीने म्हटले आहे.
बुरखा काढा नाही तर कात्रीने कापावं लागेल -पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत असे नमूद आहे की, मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालयात NEETचा पेपर घेण्यात आला होता. मात्र, या विद्यार्थ्यांसह इरम मोहम्मद जाकीर व अरिबा समन गझनफर हुसैन यांच्या सोबत केंद्रातील प्रशासकीय अधिकारी व सदस्यांशी गैरवर्तन केले व ते म्हणाले की बुरखा काढा नाही तर कात्रीने कापावं लागेल. एवढंच नव्हे तर भर रसत्यात हिजाब व बुरखा काढायला लावला गेलं असल्याचा आरोप पालकांकडून करण्यात आलं आहे.
रस्त्यावर बुरखा आणि हिजाब काढण्यात आला - पीडित विद्यार्थिनीने सांगितले की, आधी परीक्षा कक्षात येण्यास मज्जाव करण्यात आला, नंतर हिजाब आणि बुरखा काढून टाका असे सांगून बाहेर पाठवण्यात आले, बराच वादावादी झाल्यानंतर शेवटी रस्त्यावर बुरखा आणि हिजाब काढण्यात आला. परीक्षा कक्षात ही उपस्थित शिक्षकाचा वर्तन योग्य नसल्याचेही पीडित विद्यार्थिनीने म्हटले आहे.या प्रकरणी वाशिम शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार प्राप्त झाली असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी ठानेदार रफीक शेख हे करत आहे. चौकशी अंती योग्य ती कारवाई केली जाणार असल्याची माहिती वाशिमचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील कुमार पुजारी यांनी दिली.