वाशिम -संपूर्ण जगात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूमुळे आत्तापर्यंत अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, मागील २२ मार्च पासून संपूर्ण देशामध्ये 'लॉकडाऊन' करण्यात आले आहे. अशातच कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या सूचनेवरून 'शब-ए-बारात'निमित्त सर्व मुस्लिम बांधवांनी मस्जिद तसेच कब्रस्तानमध्ये न जाता घरीच इबादत केली आहे.
लॉकडाऊन असल्यामुळे तसेच प्रशासनाच्या सूचनेवरून जिल्ह्यातील मौलवी यांनी 'शब-ए-बारात'निमित्त मस्जिद तसेच कब्रस्तानला जाऊ नये, असे आवाहन केले होते. प्रशासनाच्या तसेच मौलवींच्या सूचनेवरून लोकांनी आपल्या घरीच राहून नमाज अदा करून अल्लाह (ईश्वर)ची इबादत केली आहे.