महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

देशावरील कोरोनाचे संकट दूर व्हावे यासाठी वाशिमच्या मुस्लिम बांधवांची प्रार्थना - वाशिम मुस्लिम समुदाय

मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना रमजान सुरू आहे व आजचा 12वा रोजा (उपवास) आहे. या कालावधीत वाशिम जिल्ह्यातील मुस्लिम बांधव इफ्तार व नमाज पठण घरात थांबूनच करत आहे.

washim ramzan
देशावरील कोरोनाचे संकट दूर व्हावे यासाठी वाशिमच्या मुस्लिम बांधवांची प्रार्थना

By

Published : May 7, 2020, 9:33 AM IST

वाशिम - कोरोनाला रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन लागू केले आहे. त्यामुळे बाजारपेठा, धार्मिक स्थळे बंद आहेत. अशा स्थितीत मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना रमजान सुरू आहे व आजचा 12वा रोजा (उपवास) आहे. या कालावधीत वाशिम जिल्ह्यातील मुस्लिम बांधव इफ्तार व नमाज पठण घरात थांबूनच करत आहे.

ज़िया अहेमद खान, सेवानिवृत्त शिक्षक
दररोज पहाटे "सहेरी" आणि सायंकाळी "इफ्तार" म्हणजे नामस्मरण आणि बंधुभाव जोपासण्याची वेळ. सध्या लॉकडाऊन आहे आणि या काळात रमजानचे उपवास चांगल्या प्रकारे पार पडत असल्याची माहिती वाशिम येथील सेवानिवृत्त शिक्षक ज़िया अहेमद खान यांनी दिली आहे. देशाला कोरोना महामारी पासून मुक्ती मिळावी यासाठी रमजान या पवित्र महिन्यात केलेली प्रार्थना ईश्वर कबूल करत असल्याचेही यावेळी ते म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details