महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बिल भरूनही वीजेपासून वंचित; शेतकऱ्यांकडून टॅक्टरने पिकाला पाणी - MSEDCL cut electricity connections in Washim

वीज बिल भरून विद्युत पुरवठा बंद असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. पाण्याअभावी पिकाचे नुकसान होऊ नये, म्हणून धरणावर ट्रॅक्टर लावून पाणी देण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे.

water supply by tractor
ट्रॅक्टरने पिकाला पाणी पुरवठा

By

Published : Mar 13, 2021, 10:01 PM IST

Updated : Mar 13, 2021, 10:35 PM IST

वाशिम -वीज बिल थकित असल्याने अनेक शेतकऱ्यांचे वीज जोडणी तोडल्या जात आहेत. ज्या शेतकऱ्यांनी बिल भरलेले नाही, त्या परिसरातील डीपी बंद करण्यात येत आहेत. त्यामुळे वीज बिल भरलेले शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

वीज बिल भरून विद्युत पुरवठा बंद असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. पाण्याअभावी पिकाचे नुकसान होऊ नये, म्हणून धरणावर ट्रॅक्टर लावून पाणी देण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे.

शेतकऱ्यांकडून टॅक्टरने पिकाला पाणी

हेही वाचा-मास्क व्यवस्थित घातला नाही तर प्रवाशांना विमानातून उतरवावे-डीजीसीआयचे आदेश

मालेगाव तालुक्यात वीज बिल भरलेल्या शेतकऱ्यांची वीज जोडणी तोडण्याचा अजब प्रकार महावितरणकडून सुरू आहे. यामध्ये एका वीज रोहित्रामधून 1 गावातील कृषीपंपांना वीज पुरवठा दिला जात असल्याचे शेतकरी विनोद भोयर यांनी सांगितले. पण यामध्ये काही तुरळक शेतकऱ्यांनी न भरलेल्या वीजबिलामुळे संपूर्ण रोहित्र परिसरातील वीजपुरवठा खंडित केला जात असल्याचा प्रकार घडत आहे. यामुळे वीज बिल भरूनही त्रास होत असताना मालेगाव परिसरातील शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे. त्यातच मालेगाव तालुक्यातील सुदी येथील शेतकऱ्यांनी पिके वाळून जाऊ नये, म्हणून इंजिन व टॅंकरवर पंप चालवून पिकांना पाणी देत आहेत. वाढता इंधन दर बघता त्यांच्या पाणी देण्याच्या खर्चात वाढ होत आहे.

हेही वाचा-गळफास घेण्याचं नाटक बेतलं महिलेच्या जीवावर, स्टूलावरून पाय घसरल्याने मृत्यू

Last Updated : Mar 13, 2021, 10:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details