महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाशिम जिल्ह्यात सात उपकेंद्रांवर राज्य सेवा पूर्व परीक्षा सुरू - वाशिम एमपीएससी परीक्षा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्य सेवा पूर्व परीक्षा- २०२० आज रविवार, २१ मार्च रोजी वाशिम शहरातील सात परीक्षा उपकेंद्रांवर सकाळी १० वाजता सुरू झाली. यानंतर दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातून २५६८ परीक्षार्थी ही परीक्षा देत आहेत.

mpsc exam starts at 7 centers in washim
वाशिम

By

Published : Mar 21, 2021, 12:03 PM IST

वाशिम: अनेक दिवसापासून प्रतीक्षेत असलेल्या राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. शहरात सात केंद्रावर 2,568 विद्यार्थी उमेदवार परीक्षेला बसणार आहेत. शासनाच्या आदेशाप्रमाने कोरोना नियमांचे पालन करून या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर प्रवेश दिला जात आहे. परीक्षेसाठी नियुक्त केलेल्या 300 कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असून या परीक्षेदरम्यान योग्य खबरदारी घेतली जात असल्याचे चित्र वाशिम शहरात आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्य सेवा पूर्व परीक्षा- २०२० आज रविवार, २१ मार्च रोजी वाशिम शहरातील सात परीक्षा उपकेंद्रांवर सकाळी १० वाजता सुरू झाली. यानंतर दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातून २५६८ परीक्षार्थी ही परीक्षा देत आहेत.

वाशिम जिल्ह्यात सात उपकेंद्रांवर राज्य सेवा पूर्व परीक्षा सुरू..

वाशिम शहरातील परीक्षा उपकेंद्रे-
वाशिम शहरातील राजस्थान महाविद्यालय, हॅपी फेसेस हायस्कूल, श्री शिवाजी हायस्कूल, राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा, बाकलीवाल विद्यालय, एस. एम. सी. इंग्लिश स्कूल व जवाहर नवोदय विद्यालय या सात उपकेंद्रांवर परीक्षेला सुरुवात झाली आहे.

काय बाळगता येणार सोबत -
उमेदवारांना परीक्षा कक्षात प्रवेश प्रमाणपत्र, काळा शाईचा पॉईंट पेन, मूळ ओळखपत्र व त्याची रंगीत छायांकित दोन प्रत इत्यादी साहित्य सोबत आणण्याची मुभा दिली आहे . या व्यतिरिक्त इतर कोणतेही साहित्य उमेदवारांना सोबत बाळगता येणार नाही. उमेदवारांना एकदा परीक्षा उपकेंद्रावर प्रवेश दिल्यानंतर परीक्षा संपेपर्यंत परीक्षा केंद्राबाहेर जाता येणार नाही.

गैरप्रकार केल्यास फौजदारी गुन्हे दाखल होणार -
आयोगामार्फत आयोजित परीक्षेमध्ये कॉपी, गैरप्रकार करताना आढळल्यास संबंधितावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याच्या सूचना आयोगाने दिल्या आहेत. परीक्षा उपकेंद्रांवर उमेदवारांची तपासणी (फ्रीस्किंग) करण्यासाठी खाजगी सेवा पुरवठादार संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे.आयोगाकडून परीक्षेच्या पर्यवेक्षणासाठी विशेष निरीक्षक, भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षेच्या पर्यवेक्षणाकरिता आयोगाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा -अखेर दिवस उजाडला..! कोरोनाचे नियम पाळत एमपीएससीच्या परीक्षेला सुरुवात

ABOUT THE AUTHOR

...view details