महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खासदार भावना गवळी यांनी वाशिम जिल्ह्यात 10 हजार गरजूंना केले किराणा आणि अन्न ध्यान्य वाटप - News about Corona virus

खासदार भावना गवळी यांनी वाशिम जिल्ह्यात 10 हजार गरजूंना अन्न धान्य वाटप केले. यामुळे लॉक डाऊन संपेपर्यंत या मजूर कुटुंबाना दिलासा मिळाला आहे.

MP Bhavana Gawli distributed food grains to the needy in Washim district
खासदार भावना गवळी यांनी वाशिम जिल्ह्यात 10 हजार गरजूंना केले किराणा आणि अन्न ध्यान्य वाटप

By

Published : Apr 25, 2020, 5:33 PM IST

वाशिम - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन लागू केल्यानंतर मजुरांचा रोजगार गेल्यामुळे ते अडचणीत आले आहेत. बाहेर राज्यातील मजुरांची शासनाच्या वतीने व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, स्थानिक मजूर मोठ्या प्रमाणात अडचणीत आले आहेत. वाशिम जिल्ह्यातील अशा दहा हजार गरजू कुटुंबाना खासदार भावना गवळी यांनी गावात जाऊन किराणा आणि अन्न धान्याचे वाटप केले.

खासदार भावना गवळी यांनी वाशिम जिल्ह्यात 10 हजार गरजूंना केले किराणा आणि अन्न ध्यान्य वाटप

यामुळे लॉकडाऊन संपेपर्यंत या मजूर कुटुंबाना दिलासा मिळाला आहे. सरकारने लॉकडाऊन वाढविला तर यापुढे ही अन्न धान्य वाटप करणार असल्याचे गवळी यांनी यावेळी बोलताना सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details