वाशिम -तालुक्यातील गिंभा येथील गायत्री अनिल भगत (वय ३२) या मातेने आपल्या ४ वर्षीय बालिकेची फाशी देऊन हत्या केल्याची खळबळ जनक घटना वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपी तालुक्यातील ग्राम गिंभा येथे घडली. अनिल किसन भगत (रा. गिंभा) यांनी ७ जानेवारीला पोलिसांत तक्रार दिली की त्यांची पत्नी गायत्री अनिल भगत हिने सकाळी ९.३० ते ११.४५ दरम्यान स्व:ताची साडी फाडुन तनिक्षा अनिल भगत या आपल्या पोटच्या मुलीची एका झाडाला फाशी देऊन हत्या केली. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ निर्माण झाली असून आरोपी मातेला पोलिसांनी अटक केली आहे.
वाशिममध्ये आईनेच केली पोटच्या मुलीची हत्या - Washim Police News
वाशिम तालुक्यातील गिंभा येथील गायत्री अनिल भगत या मातने आल्या ४ वर्षीय बालिकेची फाशी देऊन हत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी मातेला अटक केली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.
आईनेच केली पोटच्या मुलीची हत्या
अटक केल्यानंतर सदर मातेचे हातपाय बांधण्यात आले होते. तिने पोलीस ठाण्याच्या आवारात स्वत: फाशी घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आरोपीविरुध्द कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार विनोद दिघोरे, हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर राठोड करत आहे.