कपडे धुण्यासाठी गेलेल्या सासू-सुनेचा तलावात बुडून मृत्यू - कारंजा महिला बुडून मृत्यू बातमी
कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन महिलांचा तलावात बुडून मृत्यू झाला. या दोन्ही महिला विटभट्टीवर काम करत होत्या.

वाशिम मृतदेह
वाशिम -कारंजा तालुक्यातील कोळी गावातील तलावावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या सासू-सुनेचा तलावात बुडून मृत्यू झाला. दोन्ही महिला गावात विटभट्टीवर काम करतात. कपडे धुताना अचानक सुनेचा तोल गेला व ती तलावात पडली. सुनेला वाचवण्यासाठी गेलेल्या सासूचा देखील पाण्यात बडून मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच कारंजा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बुडालेल्या दोन्ही महिलांचे मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवले. या प्रकणाचा अधिक तपास कारंजा शहर पोलीस करत आहेत.