महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाशिममध्ये अर्भकाला फेकणाऱ्या मातेला अटक - throwing newborn baby in washim

अकोला-हिंगोली या महामार्गावरील पुसद नाका परिसरात विविध खासगी रुग्णालये आहेत. दरम्यान या परिसरात अंदाजे 3 दिवसाचे पुरुष जातीचे अर्भक सापडले होते. त्यानंतर वाशिम पोलिसांनी या नवजात अर्भकाला ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयात दाखल केले. अर्भकाला बेवारस टाकणाऱ्या व्यक्तीचा शोध वाशिम शहर पोलीसांनी घेतला असून या अर्भकाच्या मातेला ताब्यात घेतले आहे.

Mother arrested for throwing baby in washim
वाशिममध्ये अर्भकाला फेकणाऱ्या मातेला अटक

By

Published : Aug 15, 2020, 8:02 AM IST

वाशिम -वाशिम शहरातील हिंगोली मार्गावर एका रुग्णालयाच्या बाजूला 12 ऑगस्ट रोजी पुरुष जातीचे नवजात अर्भक बेवारस स्थितीत आढळून आले होते. या घटनेनंतर, वाशिम पोलिसांनी तपास करून त्या अर्भकाला फेकणाऱ्या मातेला ताब्यात घेतले आहे.

वाशिम पोलिसांनी या नवजात अर्भकाला ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

अकोला-हिंगोली या महामार्गावरील पुसद नाका परिसरात विविध खासगी रुग्णालये आहेत. दरम्यान या परिसरात अंदाजे 3 दिवसाचे पुरुष जातीचे अर्भक सापडले होते. त्यानंतर वाशिम पोलिसांनी या नवजात अर्भकाला ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयात दाखल केले. अर्भकाला बेवारस टाकणाऱ्या व्यक्तीचा शोध वाशिम शहर पोलीसांनी घेतला असून या अर्भकाच्या मातेला ताब्यात घेतले आहे. या महिलेची ठाणेदार योगिता भारद्वाज यांच्या मार्गदर्शनात पोलीस कसून चौकशी करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details