वाशिम जिल्ह्यात पावसामुळे मूग पिकाचं नुकसान, तयार शेंगांना फुटले कोंब - wahsim farmer news
दरवर्षी प्रमाणे यंदाही मूग पिकाची स्थिती चांगली होती. मुगाच्या शेंगा परिपक्व झाल्यामुळे चांगले उत्पादन मिळण्याची आशा शेतकऱ्यांना होती. परंतु, गेल्या आठ दिवसांपासून चालू असलेल्या पावसामुळे मुगाच्या शेंगतील दाणे भिजल्याने त्यांना कोंब आले आहेत.
मुगाच्या शेंगा पावसामुळे भिजल्या
वाशिम जिल्ह्यात पावसामुळे मूग पिकाचं नुकसान, तयार शेंगांना फुटले कोंब
वाशिम - जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मूग पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे परिपक्व शेंगा भिजून त्यातून कोंब बाहेर येत आहेत. शेतकऱ्यांच्या हाती आलेल्या पिकाचे पावसामुळे अतोनात नुकसान होत असल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे.
जिल्ह्यात आधीच शेतकऱ्यांना निकृष्ट बियाण्यांमुळे दुबार, तिबार पेरणीचा खर्च करावा लागला. त्यात आता सततच्या पावसामुळे पिके संकटात सापडल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. कृषी व महसूल विभागाने या नुकसानाची पाहणी करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.