वाशिम- जिल्ह्यातील आमगव्हाण येथील एका शेतातील विहिरीत पडलेल्या माकडाची वन्यजीवप्रेमींनी २ तासांच्या अथक प्रयत्नानंतर सुटका केली. पाण्याच्या शोधार्थ हे माकड विहिरीत पडल्याचे येथील शेतकऱ्याने सांगितले.
पाण्याच्या शोधार्थ माकड पडले विहिरीत; २ तासांच्या अथक प्रयत्नानंतर सुटका - thursty
जंगलातील जलसाठे कोरडे पडल्याने वन्य प्राणी शेतशिवारांसह लोकवस्तीकडे पाण्यासाठी घाव घेत आहेत. मानोरा तालुक्यातील कोलार परिसरात हे चित्र सर्रास पाहायला मिळत आहे.
जंगलातील जलसाठे कोरडे पडल्याने वन्य प्राणी शेतशिवारांसह लोकवस्तीकडे पाण्यासाठी घाव घेत आहेत. मानोरा तालुक्यातील कोलार परिसरात हे चित्र सर्रास पाहायला मिळत आहे. आमगव्हाण येथील शेतकरी श्यामराव बाबुराव कानोडे यांच्या शेतात माकडांचा कळप पाण्याच्या शोधात आला होता. यावेळी कळपासोबत असलेले एक माकड विहिरीत पडले. हे श्यामराव कानोडे यांना दिसली. त्यांनी याबाबत आमगव्हाणच्या पोलीस पाटलांना माहिती दिली. वन्यजीवप्रेमींनी घटनास्थळी पोहोचून शिडीच्या आधारे माकडास सुरक्षितरित्या बाहेर काढून जंगलात सोडले.