वाशिम -सांगली-कोल्हापूरमधील पूरग्रस्तांसाठी रॅली काढून वाशिमकरांनी मदत गोळा केली. पूरग्रस्तांसाठी वाशिमकरांच्या वतीने मदतीचा ओघ सुरुच आहे. ग्रामीण भागातील नागरिक गहू, तांदूळ, डाळ जीवनावश्यक धान्य जमा करून पाठवीत आहेत. बुधवारी वाशिम शहरातील नागरिकांनी रॅली काढून पुराग्रस्तांसाठी मदत मागितली.
पूरग्रस्तांसाठी रॅली काढून वाशिमकरांनी केली मदत गोळा - sangali flood
सांगली-कोल्हापूरमधील पूरग्रस्तांसाठी रॅली काढून वाशिमकरांनी मदत गोळा केली. पूरग्रस्तांसाठी वाशिमकरांच्या वतीने मदतीचा ओघ सुरुच आहे.
पूरग्रस्तांसाठी रॅली काढून मदत
या रॅलीतून जमा झालेली रक्कम जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा करण्यात येणार आहे. तसेच नगर परिषद कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांचे एक दिवसाचे वेतनही याच रक्कमेत जमा केले जाणार आहे. जमा झालेला निधी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पुराग्रस्तांच्या मदतीसाठी पाठविण्यात येणार आहे.