वाशिम - बसस्थानाकावर आज मनसेच्या वतीने औरंगाबाद बसची पाटी काढून त्याजागी छत्रपती संभाजीनगर नावाचा बोर्ड लावण्यात आला.
सरकारविरोधात घोषणाबाजी
वाशिम - बसस्थानाकावर आज मनसेच्या वतीने औरंगाबाद बसची पाटी काढून त्याजागी छत्रपती संभाजीनगर नावाचा बोर्ड लावण्यात आला.
सरकारविरोधात घोषणाबाजी
औरंगाबाद शहराच्या नामांतरावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. वाशिमच्या मनसे कार्यकर्त्यांनी औरंगाबादमध्ये नामांतरावरून आक्रमक पावित्रा घेतला असून कार्यकर्त्यांनी वाशिम बसस्टॉपवर एसटी बसमध्ये लावण्यात आलेली पाटी काढून त्याजागी छत्रपती संभाजीनगर अशी पाटी लावली. तसेच हातात बोर्ड घेऊन सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
26 जानेवारीचा अल्टिमेटम
राज्य सरकारला 26 जानेवारीचा अल्टिमेटम मनसे कार्यकर्त्यांनी दिला आहे. हे आंदोलन वाशिम मनसेच्यावतीने करण्यात आले आले. या आंदोलनात मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी होते.