वाशिम- परजिल्ह्यातून आलेल्या मजुरांना जंगलाजवळ क्वारंटाईन करण्यात आले. त्यांना खाण्यापिण्याची सोयही नव्हती. याबाबत 'ईटीव्ही भारत'ने वृत्त प्रकाशीत केले होते. त्यानंतर या मजूरांच्या मदतीसाठी अनेकांनी हात पुढे केले आहेत. यात रिसोड-मालेगाव विधानसभा मतदारसंघातील आमदार अमित झनक यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या मजूरांना एका महिन्याचे धान्य व किराणा किट देऊ केले आहे. यामुळे या मजूरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते.
'ईटीव्ही भारत इम्पॅक्ट' : जंगलात क्वारंटाईन केलेल्या 'त्या' कुटुंबांना अखेर मदत मिळाली - quarantine news
जिल्ह्यातील वरदरी खुर्द ग्रामपंचायत हद्दीत आलेल्या कुटुंबियांना जंगलात क्वारंटाईन करुन त्यांच्या जेवणाचीही सोय केली नव्हती. याबाबत ईटीव्ही भारतमध्ये बातमी प्रकाशित झाल्यानंतर याची दखल घेत आमदार अमित झनक यांच्यासह इतरांनीही या कुटुंबियाची मदत केली.
!['ईटीव्ही भारत इम्पॅक्ट' : जंगलात क्वारंटाईन केलेल्या 'त्या' कुटुंबांना अखेर मदत मिळाली क्वारंटाईमध्ये असलेले कुटुंबिय](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7065832-thumbnail-3x2-impct.jpg)
क्वारंटाईमध्ये असलेले कुटुंबिय
ईटीव्ही भारतचे आभार मानताना आमदार झनल
जंगलात क्वारंटाईन केलेल्या 'त्या' कुटुंबांना अखेर मदत मिळाली
Last Updated : May 5, 2020, 1:31 PM IST