वाशिम- राज्यभरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जात आहे. कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषात वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करीत आहे. मात्र, वाशिम विधानसभा राखीव मतदारसंघातील विद्यमान आमदार लखन मलिक यांनी ५०० मुलांची पारंपरिक पध्दतीने दिंडी काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
आमदार लखन मलिक यांनी पारंपरिक दिंडी काढून भरला उमेदवारी अर्ज - Lakhan Malik Student Dindi Wasim
वाशिम जिल्ह्यात सध्या सोयाबीनचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे कार्यकर्ते मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे वाशिमचे विद्यमान आमदार लखन मलिक यांनी ५०० मुलांची पारंपरिक पध्दतीने दिंडी काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
रॅली
जिल्ह्यात सध्या सोयाबीनचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे कार्यकर्ते मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विद्यमान आमदार लखन मलिक यांनी ५०० मुलांची पारंपरिक पध्दतीने दिंडी काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दिंडी शिवाजी चौकातून होत तहसील कार्यालयात पोहोचली. त्यानंतर तहसील कार्यालयात मलिक यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
हेही वाचा-वंचित आघाडीचे डॉ. सिद्धार्थ देवळेंचा उमेदवारी अर्ज दाखल