वाशिम - जिल्ह्यात मतदानला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील एकूण तीन मतदारसंघात 9 लाख 58 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. रिसोड विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार अमित झनक यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. जास्तीत-जास्त मतदारांनी मतदान करावे असे, आवाहन अमित झनक यांनी केले.
विद्यमान आमदार अमित झनक यांनी बजावला मतदानाचा हक्क - वाशिम विधानसभा निवडणूक
वाशिम जिल्ह्यात मतदानला सुरुवात झाली आहे. रिसोड विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार अमित झनक यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
रिसोड विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार अमित झनक
वाशिम जिल्ह्यातील 1 हजार 52 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. महिलांसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात दोन या प्रमाणे जिल्ह्यात 6 ‘सखी मतदार केंद्रे’ स्थापन केली आहेत. निवडणुकीसाठी सुमारे 4 हजार 636 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याच बरोबर मतदान केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.